आलिया आणि अर्जुन एकमेकांबाबत `सिरीअस`?, Arjun Kapoor and Alia Bhatt are a couple!

आलिया आणि अर्जुन एकमेकांबाबत `सिरीअस`

आलिया आणि अर्जुन एकमेकांबाबत `सिरीअस`
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बी-टाऊनमध्ये एक नवीन जोडपं आता आपल्याला दिसणार आहे. ते म्हणजे आलिया भट आणि अर्जुन कपूर... चमकलात का? पण, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खरोखरच आलिया अर्जुनबाबत ‘सिरिअस’ झालीय.

एका एन्टरटेन्मेंट वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, सध्या आलिया आणि अर्जुन चिक्कार वेळ एकमेकांसोबत घालवत आहेत. ‘फ्रेंडशीप’पेक्षा जास्त जवळीक दोघांमध्ये निर्माण झालीय. अर्जुनच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्येही हे दोघे जण सगळे पाहुणे गेल्यानंतरही पार्टीची मजा घेत होते.

आलिया भट आणि अर्जुन कपूर हे दोघे लवकरच ‘टू स्टेटस् – द स्टोरी ऑफ माय मॅरेज’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हा सिनेमा अजूनही पूर्ण झालेला नाही. याच सिनेमाच्या शूटींगदरम्यान आलिया आणि अर्जुन यांच्यात जवळीक निर्माण झालीय. आपण अपेक्षा करूयात की, दोघांची ‘ऑफस्क्रीन’ केमिस्ट्री आपल्याला ‘ऑनस्क्रीन’ही दिसेल.

यापूर्वी आलिया वरुध धवनशी डेटिंग करत होती तर अर्जुन सलमान खानची छोटी बहिण अर्पिता हिच्याबरोबर प्रेमसंबंधात होता, अशीही चर्चा सुरू होती. आता प्रेक्षकांना प्रतिक्षा असेल ती हे दोघे जण आपलं प्रेम उघडपणे व्यक्त करतात का? याकडे...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, July 11, 2013, 12:15


comments powered by Disqus