ए आर रेहमान यांच्या घरावर अज्ञातांचा हल्ला, attack on A R Rehman home

ए आर रेहमान यांच्या घरावर अज्ञातांचा हल्ला

ए आर रेहमान यांच्या घरावर अज्ञातांचा हल्ला

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या घरावर नुकताच काही अज्ञात इसमांनी हल्ला केल्याचं समोर आलंय. खुद्द रेहमान यांनीही ट्विटरवरून या हल्ल्याचं चित्र आपल्या चाहत्यांशी शेअर केलंय.

ए. आर. रेहमान यांच्या लॉस एन्जेलीस येथील घरावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला आहे. रेहमान यांनी सोमवारी स्वत:च ट्विट करून ही माहिती दिली आहे. चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या ए.आर. रेहमान यांना 2000 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. तसेच रेहमान यांना २00९ मध्ये त्यांच्या `स्लमडॉग मिलेनियर` या चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

रेहमान यांनी आपल्या बंगल्याच्या छायाचित्रांसह ट्विट करताना म्हटले की, लॉस एंजिलीसमध्ये माझ्या घराची तोडफोड झाली आहे. छायाचित्रात त्याच्या घराच्या भिंतीवर काळ्या शाहीने काही लिहिलेलेही दिसून येत आहे.




* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 20, 2014, 10:21


comments powered by Disqus