अभिनेत्री आयेशा टाकिया झाली आई!Ayesha Takia became Mother, birth baby Boy

अभिनेत्री आयेशा टाकिया झाली आई!

अभिनेत्री आयेशा टाकिया झाली आई!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

‘वॉन्टेड’ चित्रपटातली सलमान खानची हिरोईन आणि अबु आझमींची सून अभिनेत्री आयेशा टाकिया आई झालीय. आयेशा टाकियाला मुलगा झालाय.

`टारझन द वन्डर कार` चित्रपटाद्वारं बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी आयेशा टाकीया बऱ्याच काळापासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. `सूरक्षेत्र` या टीव्हीवरील संगीत रियालिटी शोमध्ये शेवटची दिसलेल्या आयेशानं गेल्या आठवड्यात पुत्ररत्नाला जन्म दिला. तिच्या घरी आनंदाचं वातावरण असून, पती फरहान आझमीनं टि्वटरवर लिहिलेल्या संदेशात देवाचे आभार मानत आनंद व्यक्त केला.

आयेशानंदेखील टि्वटरवर प्रियजनांचे आभार मानून आपला आनंद व्यक्त केला. टि्वटरवर पोस्ट केलेल्या संदेशात ती म्हणते, प्रियजनांकडून मिळालेले आशीर्वाद आणि शुभसंदेशांसाठी मी आणि माझा मुलगा सर्वांचे आभारी आहोत.

सलमान खानबरोबर `वॉन्टेड` चित्रपटात दिसलेल्या आयेशानं `डोर` आणि `फूल एन फायनल`सारख्या चित्रपटांतदेखील काम केलं होतं.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 10, 2013, 12:02


comments powered by Disqus