आयुष्यमान खुराणाच्या घरात आढळला मृतदेह, Ayushman Khurana`s servant found dead in actor`s home

आयुष्यमान खुराणाच्या घरात आढळला मृतदेह

आयुष्यमान खुराणाच्या घरात आढळला मृतदेह
www.24taas.com, मुंबई

‘विकी डोनर’ फेम अभिनेता आयुष्यमान खुराणाच्या घरात त्याच्या नोकराचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडालीय.

बॉलिवूडचा अभिनेता आणि गायक आयुष्यमान खुराणा याच्या गोरेगांव इथल्या घरातच त्याच्या नोकराचं शव गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत आढळलंय. २६ वर्षीय शिवप्रसाद हा आयुष्यमानच्या घरी काम करत होता. त्यानं आत्महत्या केली असावी, असं प्रथमदर्शनी दिसून येतंय. त्यानं शनिवारीच आपलं जीवन संपविल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्यानं आत्महत्या का केली, याचा शोध घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट घटनास्थळावरून प्राप्त झालेली नाही.

शिवप्रसादच्या आत्महत्येमुळे आपल्याला धक्का बसल्याचं आयुष्यमाननं म्हटलंय. शिवप्रसाद हा गेल्या पाच ते सहा वर्षांपासून आयुष्यमानच्या घरी काम करत होता.

First Published: Monday, March 4, 2013, 09:51


comments powered by Disqus