आयुषमान बनणार मराठी शास्त्रज्ञ `शिवकर तळपदे`, Ayushmann Khurrana playing scientist Shivkar Talpade in his next

आयुषमान बनणार मराठी शास्त्रज्ञ `शिवकर तळपदे`

आयुषमान बनणार मराठी शास्त्रज्ञ `शिवकर तळपदे`
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

‘विकी डोनर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेला आयुषमान खुराना आता मराठी शास्त्रज्ञ शिवकर तळपदे यांची भूमिका साकारत आहे. शिवकर तळपदे हे महाराष्ट्रातील असे शास्त्रज्ञ होते, ज्यांनी युरोपातील राईट बंधूंच्याही आधी स्वयंचलित विमानाचा शोध लावला असल्याचं मानलं जातं. या सिनेमात तळपदेंची भूमिका करत असलेला आयुषमान सध्या मराठीचे धडे घेत आहे.

आयुषमान खुराना आपल्या भूमिकेबद्दल म्हणाला, “मला अशा प्रकारच्या सिनेमात काम करायला खूप आवडतं. मला अशाच प्रकारचं चरित्र साकारण्याची इच्छा होती. करिअरच्या सुरूवातीलाच मला अशी भूमिका साकारायला मिळते, याचा मला अभिमान वाटतोय. माझ्या सिनेमाचे स्क्रीन रायटर मराठी असल्यामुळे मराठी भाषेसंदर्भात ते मला मार्गदर्शन करत आहेत.”
सध्या आयुषमान खुराना यशराज फिल्म्सच्या ‘बेवकुफियाँ’ या सिनेमात काम करत आहे. त्यानंतर तळपदेंवरील सिनेमाचं शुटिंग सुरू होणार आहे. पुढील वर्षी हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, October 7, 2013, 16:47


comments powered by Disqus