Last Updated: Tuesday, March 19, 2013, 14:36
www.24taas.com, मुंबईसामान्य माणसाच्या मुलाने गीतेतील १४ अध्याय तोंडी पाठ केला तरी त्याचं महत्त्व नाही, पण अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची मुलीने गायत्री मंत्र म्हटला तर ती खूप मोठी गोष्ट होते.
अभिषेक आणि ऐश्वर्या यांची मुलगी आराध्या आता १६ महिन्याची झाली आहे. तीच्या छोट्या मोठ्या गोष्टी अभिषेक आणि ऐश्वर्या सोशल नेटवर्कींग साईटवर पोस्ट करत असतात. आराध्या बच्चन खूप सहजपणे गायत्री मंत्राचे उच्चारण करते, असे ऐश्वर्या रायने काही दिवसांपूर्वी आपल्या काही मित्रांना सोशल नेटवर्कींग साइटच्या माध्यमातून शेअर केल्याची बातमी एका वर्तमानपत्राने दिली आहे.
आराध्या केवळ गायत्री मंत्र म्हणत नाही तर ती १ ते १० अंक तसेच ए टू झेड हे इंग्रजी अद्याक्षरेही न चुकता म्हणते.
First Published: Tuesday, March 19, 2013, 14:36