`बाल्ड अॅन्ड ब्युटीफूल`... मनिषा कोईराला!, bald and buitiful manish koirala

`बाल्ड अॅन्ड ब्युटीफूल`... मनिषा कोईराला!

`बाल्ड अॅन्ड ब्युटीफूल`... मनिषा कोईराला!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

कॅन्सरवर मात करून भारतात परतलेल्या मनिषाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर साफ झळकतोय. केमोथेरपीमुळे तिचे केस गळाले असले तरी आजही ती तितकीच सुंदर दिसतेय.

सुंदर केस हे स्त्रियांच्या सौंदर्याचा एक भाग समजला जातो. पण, कॅन्सरला मुळातून नष्ट करण्यासाठी मनिषाला केमोथेरपीला सामोरं जावं लागलं आणि तिचं हे तथाकथित सौंदर्य गळून पडलं. पण, मनिषानं हिंमत न हरता कॅन्सरशी दोन हात केले. पहिल्यांदा तिलाही थोडं अजब वाटत असावं त्यामुळे ती सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवर डोक्याला कपडा बांधलेल्या फोटोंमधून दिसत होती. आता मात्र तीनं आपला केसांविना फोटो सार्वजनिक केलाय.

मनिषाच्या डोळ्यांत तिनं दिलेल्या लढ्याची आणि प्राप्त केलेल्या विजयाची चमक साफ दिसून येतंय. केसांशिवायही ती तितकीच सुंदर दिसतेय. मनिषानं तिच्या फॅन्सबरोबर शेअर केलेल्या या फोटोत ती भडक लाल रंगाच्या साडीमध्ये दिसून येतेय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, July 25, 2013, 10:48


comments powered by Disqus