ऑस्कर पुरस्कारासाठी भारतानं पाठवली ‘बर्फी’, barfi nominated for oscar award

ऑस्कर पुरस्कारासाठी भारतानं पाठवली ‘बर्फी’

ऑस्कर पुरस्कारासाठी भारतानं पाठवली ‘बर्फी’
www.24taas.com, मुंबई
मागच्याच आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘बर्फी’या चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन मिळालंय.

रणबीर कपूर, प्रियांका चोपडा आणि एलिना डीक्रूज यांनी ‘बर्फी’या चित्रपटांतील भूमिकेला योग्य पद्धतीनं न्याय दिल्याची पोचपावती अनेक प्रेक्षकांनी दिली होती. एकाच आठवड्यात रेकॉर्डतोड कमाईही या चित्रपटानं करून दाखवलीय. आता या चित्रपटाला परदेशी भाषेतील चित्रपटांच्या गटात नामांकन मिळाल्यानं या चित्रपटाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय.

अनुराग बसू दिग्दर्शित या एका आठवड्यात ५८.६ करोड रुपयांची कमाई केलीय. चित्रपटात शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या दोन व्यक्तींमधली प्रेमाची खूप सुंदर रितीनं चित्रीत करण्यात आलीय. बॉक्स ऑफिसवर धम्माल उडवणाऱ्या या चित्रपटात एलिना डिक्रूजनं पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये प्रवेश केलाय.


एकूण २० सिनेमांमधून बर्फीची निवड करण्यात आल्याचं भारतीय चित्रपट महासंघाचे महासचिव सुपर्ण सेन यांनी म्हटलंय.

First Published: Saturday, September 22, 2012, 22:25


comments powered by Disqus