Last Updated: Wednesday, February 26, 2014, 16:26
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई बॉलिवूडचा शहेनशहा आता निवडणुकीच्या रंगात रंगणार आहे... आणि याबद्दलचे पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलेत... एकदम चमकू नका... हे खरं आहे... पण, हे पाऊल अमिताभनं आपल्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात नाही तर त्याच्या आगामी सिनेमात उचललेलं दिसतंय.
विद्यार्थ्यांच्या परीक्षा सध्या सुरू आहेत... त्यामुळे, बच्चेकंपनीची मस्ती आणि धिंगाणा थोड कमी झालेला दिसतोय. पण, घाबरू नका, कारण या बच्चे कंपनीला गदगदून हसवण्यासाठी अमिताभ `भूतनाथ रिटर्न`च्या माध्यमातून तुमच्या समोर येतोय.
`भूतनाथ रिटर्न` हा २००८ साली आलेल्या `भूतनाथ`चा सिक्वेल असणार आहे. भूतनाथमध्ये अमिताभसोबत शाहरुख खान आणि जुही चावलाही दिसले होते. याच सिनेमाचा ट्रेलर मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत लॉन्च करण्यात आला. यावेळी, या सिनेमात काम करून आपल्यालाच जास्त आनंद झाल्याची भावना अमिताभ यांनी व्यक्त केलीय.
`टी-सीरिजनं मला या सिनेमासाठी पुन्हा गाठलं त्यामुळे मी त्यांचे आभार मानतोय. या सिनेमातील छोटा पार्थ हा एकच व्यक्ती आहे जो मला पाहू शकतो. या सिनेमात तोच हिरो आहे आणि मी झिरो...` असं बच्चन यांनी यावेळी म्हटलंय.
सध्याच्या घडामोडींशी जोडण्याकरीता या सिनेमात निवडणुकीचा रंगही भरण्यात आलाय आणि त्याचमुळे या सिनेमाची मजा मोठ्यांनाही तेव्हढीच घेता येईल जेव्हढी छोट्या दोस्तांना....
नितेश तिवारी दिग्दर्शित `भूतनाथ रिटर्न` या सिनेमात बोमन इराणी आणि शाहरुख खान यांचीही भूमिका आहे. ११ एप्रिल रोजी हा सिनेमा प्रदर्शित होईल.
व्हिडिओ पाहा - •
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, February 26, 2014, 16:21