वाढदिवसाबद्दल बिग बी म्हणतात...., Big B`s twit about birthday

वाढदिवसाबद्दल बिग बी म्हणतात....

वाढदिवसाबद्दल बिग बी म्हणतात....
www.24taas.com, मुंबई

११ ऑक्टोबर... बिग बी अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस... हाच प्रश्न एखाद्या लहान मुलाला विचारलं तर तोही अगदी अचूक उत्तर देईल... चार ऑप्शन न सांगताही... तर, अशाच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बिग बी च्या येणाऱ्या ७०व्या वाढदिवसाची तयारी अगदी जोशात चालू असणार यात काही शंकाच नाही.

अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाची चर्चा सध्या बॉलिवूडच्या चकचकत्या दुनियेत खूप होत असेल पण बिग बी यांच्यासाठी मात्र त्यांचा वाढदिवस हा इतर दिवसांप्रमाणेच असतो. काही दिवसांपूर्वी ‘बिग बीं’साठी पत्नी जया, डिजाईनर अबू जानी आणि संपदी खोसला यांनी ११ ऑक्टोबरला बिग बींना मोठी सरप्राइज पार्टी देण्याची तयारी करत असल्याच्या बातम्या ऐकायला मिळाल्या होत्या. याबद्दलच बीग बी यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया नोंदवलीय.

अमिताभ यांनी ट्विट केलंय ‘लख लख भेंट, लख लख बधाइयाँ, और जारी रहने की लख लख मुरादे... ७० वां जन्मदिन कुछ के लिए खास... मेरे लिए एक और दिन|’ (लाख लाख भेटी, लाख लाख शुभेच्छा, लाख लाख इच्छा... ७०वा वाढदिवस काहींसाठी खास... माझ्यासाठी मात्र आणखी एक दिवस)

First Published: Sunday, October 7, 2012, 15:01


comments powered by Disqus