‘बिग बी; फेसबूक, ट्विटरला वैतागले! , big b upset with twitter & facebook

‘बिग बी; फेसबूक, ट्विटरला वैतागले!

‘बिग बी; फेसबूक, ट्विटरला वैतागले!
www.24taas.com, मुंबई
सध्या बिग बी अमिताभ बच्चन खूप वैतागलेत... कुणावर काय विचारताय? जिथं ते आपलं म्हणणं आपल्याला हव्या तशा पद्धतीनं मांडतात, आपल्या मनातल्या भरपूर काही गोष्टी आपल्या फॅन्सबरोबर शेअर करतात, अशा फेसबूक आणि ट्विटरवर आता मात्र बिग बी भडकलेत.

ट्विटर तसेच फेसबूक या सोशल नेटवर्किंग साइटस्च्या तांत्रिक बिघाडांमुळे बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन खूपच नाराज आहे. हे बिग बींनी स्वत:च सांगितलंय, तेही आपल्या ब्लॉगवर... ‘साइटसनं हे बिघाड लवकरात लवकर दूर केले नाहीत, तर मी अकाऊंटच बंद करून टाकीन’ असं बिग बी यांनी ब्लॉगवर म्हटलंय.

कधी ब्लॉगच नाहीसा होतो तर कधी त्यावर प्रतिक्रिया नोंदणंही कठिण होऊन बसतं, अशी तक्रार बिग बी यांनी केलीय.

First Published: Saturday, September 8, 2012, 13:51


comments powered by Disqus