Last Updated: Friday, November 30, 2012, 16:17
www.24taas.com, मुंबई छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’वर आता एक हॉरर कॉमेडी सिनेमा तयार होतोय.
‘इकाई मूव्हिंग पिक्चर्स’ बिग बॉसचे निर्माते एंडेमॉल इंडियासोबत हा सिनेमा बनवण्याच्या प्रयत्नात आहे. साहजिकच हा सिनेमा बिग बॉसच्या घरात आत्तापर्यंत निवास करून आलेल्या स्पर्धकांच्या अनुभवावरही असेल. या सिनेमाची शूटींग पुढच्या वर्षी सुरू होणार आहे. बिग बॉस हा शो सीझन ६ मध्येही भलताच लोकप्रिय ठरलाय. सगळ्या वर्गांतील आणि वेगवेगळ्या वयाच्या लोकांना या शोनं आकर्षित केलंय.
रोहित जुगराज हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहे. या शोची प्रसिद्धी लक्षात घेता रोहितने हा सिनेमा दिग्दर्शित करायचे ठरवले आहे. ‘हा शो म्हणजे लोकांचा डेली सोप झालाय. हाच प्रतिसाद आम्हाला मोठ्या पडद्यावरही मिळेल’ अशी आशा एंडेमॉल इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक धर यांनी व्यक्त केलीय. या सिनेमात कोण कोण असेल यावर अजूनही खल सुरू आहे. बिग बॉसमध्ये भाग घेतलेल्या स्पर्धकांशी यासंदर्भात संपर्क केला जातोय.
First Published: Friday, November 30, 2012, 15:58