‘अरमान’मुळे ‘तनिषा’ला घरच्यांनी वाऱ्यावर सोडलं?, Has Tanishaa Mukerji’s family abandoned her?

‘अरमान’मुळे ‘तनिषा’ला घरच्यांनी वाऱ्यावर सोडलं?

‘अरमान’मुळे ‘तनिषा’ला घरच्यांनी वाऱ्यावर सोडलं?

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

रिअॅलिटी शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बीग बॉस’च्या घरात कुशाल-गौहर आणि अरमान-तनिषा यांचं एकमेकांवर प्रेम आहे हे आता काही लपून राहिलेलं नाही. या दोन्ही जोड्यांनी आपापल्या प्रेमाची कबुलीही या शोमध्ये अनेकदा देऊन टाकलीय. परंतु, एका वेबसाईटच्या म्हणण्यानुसार तनिषा-अरमानच्या वाढत्या जवळिकीमुळे तनिषाच्य कुटुंबीयांनी तिच्याशी नातंच तोडून टाकलंय.

या गोष्टीत किती तथ्य आहे हे सांगण्यासाठी बीग बॉसच्या घरातील एका भागाचाही दाखला दिला गेलाय. या भागात संग्राम, अँन्डी, गौहर आणि काम्या यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या प्रत्येकाच्या कुटुंबीयांपैकी कुणी ना कुणी आलं होतं. परंतु, तनिषा आणि अरमान यांना भेटण्यासाठी मात्र कुणीही आलं नव्हतं. याबाबतीत सांगायची गोष्ट अशी की अरमाननंच निर्मात्यांना सांगून आपल्य घरातील कोणत्याही सदस्यास या घरात येण्यापासून मनाई केली होती... परंतु तनिषानं असं सांगितलेलं नसतानाही कुणीही तिला भेटायला घरात दाखल झालं नाही.

बातमीनुसार, तनिषाची अरमानसोबत वाढत्या जवळिकीमुळे तिची मोठी बहिण काजोल आणि मेहुणा अजय देवगन तिच्यावर नाराज आहेत. त्यामुळे ते तिला भेटण्यासाठी बीग बॉसच्या घरात गेले नाहीत. त्यामुळे तनिषाच्या आईनं म्हणजेच अभिनेत्री तनुजानं आपल्या मुलीसोबत संबंध तर तोडले नाहीत ना? अशी शंका व्यक्त केली जातेय.

कालच्या भागात अरमाननं पुन्हा एकदा घरात एन्ट्री केल्यानंतर तनिषा त्याला खूप वेळ बिलगून उभी होती... पण, तिला खूप आनंद झाला होता हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 3, 2013, 14:33


comments powered by Disqus