सलमानला आली ऐश्वर्याची आठवण!, `Bigg Boss 7`: When Salman Khan mentioned Aishwarya Rai

सलमानला आली ऐश्वर्याची आठवण!

सलमानला आली ऐश्वर्याची आठवण!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

`बिग बॉस ७` मधील स्पर्धक शिल्पा सकलानीच्या डोळ्यांची तुलना सलमान खानने चक्क आपल्या जुन्या वादग्रस्त गर्लफ्रेंड ऐश्वर्या रायच्या डोळ्यांशी केली आहे. त्यामुळे शिल्पाला आनंद झालाय. पण इतरांना मात्र सलमानच्या तोंडून ऐश्वर्याचं नाव ऐकून चांगलाच धक्का बसला.

शनिवारच्या भागात शिल्पा सकलनीला सलमान खानने तू बरीचशी ऐश्वर्या रायसारखी दिसतेस असं म्हटलं, आणि ती चांगलीच लाजली. सलमान खान तिला असंही म्हणाला, की याच कारणामुळे अपूर्वने तुझ्याशी लग्न केलं आहे.
यापूर्वीही सलमान खानने कतरीना कैफचा उल्लेख करून सगळ्यांना आश्चर्यचकीत केलं होतं.

कतरिना आणि ऐश्वर्या दोघीही त्याच्या जुन्या गर्लफ्रेंड्स होत्या. ऐश्वर्या आणि सलमान खानचं प्रेमप्रकरण खूपच गाजलं होतं. मात्र आता ऐश्वर्या अभिषेक बच्चनची पत्नी असून एका मुलीची आईही झाली आहे. त्यामुळे आता सलमानने तिचा उल्लेख करणं खरोखरच कमाल म्हटली आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, October 9, 2013, 17:35


comments powered by Disqus