Last Updated: Friday, February 15, 2013, 13:03
www.24taas.com, मुंबई बॉलिवूडचा रंगच वेगळा...! कित्येक दिवसांचं प्रेम इथं एका झटक्यात ओसरताना दिसतं. एकमेकांचं तोंड न पाहणारी लोकं इथं काही दिवसांनी हातात हात घालताना दिसतात... तर एकमेकांसोबत अख्खं आयुष्य व्यतीत करण्याच्या शपथा घेणारी लोक एकमेकांना ओळखही देत नाहीत. असंच काहीसं घडलंय बिपाशा अन् जॉनच्या बाबतीत!
बॉलिवुडमधील नातेसंबंध हे आळवावरील पाणी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. एकेकाळी एकमेकांच्या गळ्यात पडून आणाभाका घेणारे ब्रेकअप के बाद एकमेकांना ओळखतही नाही, याची प्रचिती नुकतीच अभिनेत्री बिपाशा बसूने करून दिली आहे. जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू यांना आपण कित्येक वेळा एकमेकांसोबत शपथा घेताना पाहिलं असेल... पण, ही जोडी आता विभक्त झालीय, हेही एव्हाना सगळ्यांनाच माहित आहे. एकेकाळी बॉलिवूडमधली हॉट जोडी म्हणून जॉन-बिप्सला ओळखलं जात होतं. पण, आता ही दोघं एकमेकांचं तोंड पाहायलाही तयार नाहीत. तब्बल नऊ वर्ष ही दोघं एकमेकांना जोडीदाराच्या रुपात पाहत होती. एकमेकांना जीव लावणारे हे दोघेही एकमेकांसाठी जीव द्यायलाही तयार होती. दोघांनी ही गोष्ट कधी लपवून ठेवण्याचाही प्रयत्न केला नाही. दोघंही लवकरच विवाहबंधनात अडकणार असं सगळ्यांना वाटत असताना काहीतरी बिनसलं... आणि दोघं विभक्त झाले.
याच जॉनबद्दल एका मुलाखती दरम्यान, बिपाशाला प्रश्न विचारला गेला असता बिपाशानं ‘कोण जॉन, मी अशा कोणत्या व्यक्तीला ओळखत नाही’ असं उत्तर देऊन प्रश्न विचारणाऱ्याचं तोंडच बंद करून टाकलं. जिस्म’, ‘नो एण्ट्री’, ‘आँखे’, ‘ओमकारा’, ‘कॉर्पोरेट’, ‘अजनबी’, ‘राज’ यांसारख्या हीट चित्रपटांनंतर बिपाशाचा नवा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. हा चित्रपटही भयपट असून त्याच्या पूर्व प्रसिद्धीनिमित्त एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिला माजी प्रियकर जॉन अब्राहमविषयी तिला छेडले असता ती उसळली...कोण? मी त्याला ओळखत नाही... मला माझे स्वातंत्र्य प्रिय असून कोणी माझ्या मानेवर बसलेले मला पसंत नाही, असेही तिनं म्हटलंय.
माजी प्रियकर जॉन अब्राहम याच्याशी असलेल्या नातेसंबंधाविषयी तिने प्रथमच मीडियाशी बोलली. तुझ्या जीवनात नवा पुरुष आलाय असे छेडता ती लाजली आणि म्हणाली, ‘हरमनबद्दल तुम्ही बोलताय...मी त्याच्या सोबत आहे...याचा अर्थ आमच्यात तसे काही नाही. आम्ही कॉमन फ्रेंडस् आहोत. हरमन खूपच चांगला मुलगा आहे. फन ऍण्ड फ्रेंडली! आमचं खूप जमतंय..पण हृदयाने निर्णय घ्यायचा असतो...हृदयाला वेळ द्यावा लागतो.'
First Published: Friday, February 15, 2013, 12:49