हॉट बिपाशा आता छोट्या पडद्यावर, BIPASHA NOW ON TELEVISION

हॉट बिपाशा आता छोट्या पडद्यावर

हॉट बिपाशा आता छोट्या पडद्यावर
www.24taas.com,झी मीडिया,मुंबई

बॉलीवूडची अभिनेत्री बिपाशा बासू आता छोट्या पडद्यावर येतेय. बॉलीवूडची ही काही पहिली कलाकार नाही जी टिव्हीवर येतेय तर याआधी आमिर खान, आमिर खान, सलमान खान, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, प्रियंका चोप्रा, अक्षय कुमार याच्यासारखे अनेक कलाकारांनी छोट्या पडद्यावर काम केलय. आणि मोठ्या पडद्याबरोबरच छोट्या पडदयावरही जलवा दाखवलेला आहे.

अमेरिकन रिअॅलिटी शो `अमेरिकाज नेक्स्ट टॉप मॉडेल’च्या धर्तीवर असलेल्या शोच्या माध्यमातून ती छोट्या पडद्यावर एंट्री घेणार अशी २००९ मध्ये चर्चा केली जात होती. परंतु त्यावेळेला हे साध्य झाले नाही. परंतु आता चार वर्षानंतर ह्या शोमध्ये काम करण्यास बिपाशा तयार झालीय. या शोमध्ये ती स्पर्धकांची मार्गदर्शक असणार आहे. या शोसंबधी एपिसोड बनवण्याची तयारी जोरात सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिपाशा मार्गदर्शक होण्याबरोबरच ज्या स्पर्धकांनी यात भाग घेतलाय त्यांना प्रोत्साहन देण्याचही ती काम करणार आहे. मॉडेलसाठीचे पहिले ऑडीशन सुरु आहे. या शोची शूटिंग ऑगस्टमध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. आणि ही शूटिंग तीन महिने चालणार आहे. चित्रपटांमध्ये बिपाशा आता फारशी दिसत नाही, त्यामुळे आता छोट्या पडद्यावर होणारं तिचं दर्शन तिच्या चाहत्यांना नक्कीच खूश करेल..

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, July 14, 2013, 17:29


comments powered by Disqus