मी २ वर्षांची असल्यापासूनच बिकिनी घालते- बिपाशा Bipasha on bikini

मी २ वर्षांची असल्यापासूनच बिकिनी घालते- बिपाशा

मी २ वर्षांची असल्यापासूनच बिकिनी घालते- बिपाशा
www.24taas.com, मुंबई

बिकिनी घालण्याबद्दल प्रसिद्ध असणाऱ्या बिपाशा बासूने आपल्याला लहानपणापासूनच बिकिनीचं वेड असल्याचं कबूल केलं. बिपाशाला इंडिया रिसॉर्ट फॅशन वीकची ब्रँड अँबेसॅडर घोषित करण्यात आलं आहे.

“मी जेव्हा दोन वर्षांची होते, तेव्हा मला माझ्या वडिलांनी ऑस्ट्रेलियाहून पहिली बिकिनी आणली होती. माझ्याकडे अजूनही तो फोटो आहे. त्या बिकिनीमध्ये मी फारच गोंडस दिसत आहे.तेव्हापासूनच मला बीचेस, सूर्य आणि बिकिनीचं वेड होतं.” असं ३४ वर्षीय अभिनेत्री बिपाशा बासूने सांगितलं.

“बिकिनी घालण्याची आवड माझ्यात स्वाभाविकपणे आली. मी पडद्यावर छान दिसावं, यासाठी बिकिनी घालायला सुरूवातकेली नाही. मी इतरवेळीही बिकिनी घालते आणि त्यात मला अजिबात वावगं वाटत नाही.” असं बिपाशा बासू म्हणाली.

बिपाशाने धूम २, प्लेअर्स या सिनेमांमध्ये बिकिनी परिधान केली आहे. जेव्हा तिला विचारलं, की कुठली अभिनेत्री तुला बिकिनीमध्ये पाहायला आवडते, तेव्हा बिपाशाचं उत्तर होतं- “झीनत अमान. ती आजच्या कुठल्याही अभिनेत्रीपेक्षा हॉट दिसायची. आज काल सर्वच मुली फिट आणि सुंदर आहेत. त्यामुळे कुठलीही मुलगी बिकिनीत सुंदर दिसू शकेल.”


“बिकिनी परिधान करणं म्हणजे आत्मविश्वास परिधान करण्यासारखं आहे. कारण बिकिनी घालण्यासाठी एक प्रकारचा आत्मविश्वास असावा लागतो.” असंही बिपाशा म्हणाली.

First Published: Tuesday, March 19, 2013, 21:26


comments powered by Disqus