Last Updated: Tuesday, January 29, 2013, 16:52
www.24taas.com, मुंबई हिंदी सिनेसृष्टित एक दशकाहून अधिक वेळ काम केल्यानंतर आता मात्र ‘बिप्स’ला या व्यवसायात काम करणं खूप कठीण आहे, असं वाटतंय. ‘अभिनय हा एक क्रूर व्यवसाय’ असल्याचं तीनं म्हटलंय.
२००१ मध्ये आलेल्या ‘अजनबी’ चित्रपटातून बिपाशा बसूनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर मात्र तीनं या क्षेत्रात आपली छबी चांगलीच उमटवली. नुकताच बिपाशाचा ‘राज-थ्री’ प्रसिद्ध झालाय. पण, अजूनही बिप्सला आता मात्र आव्हानात्मक भूमिका साकारायचीय.
३४ वर्षीय अभिनेत्री बिपाशा बसू म्हणतेय की, तीनं आत्तापर्यंत साकारलेल्या भूमिकेंच्या तुलनेत तिला आणखी चांगल्या भूमिका करायच्यात. ‘मी जे काही काम करीन त्यातून माझा प्रामाणिकपणाच दिसून येईल’ असं सांगणाऱ्या बिप्सला मात्र अभिनय म्हणजे क्रूर व्यवसाय वाटतोय. ‘सिने कलाकाराचं आयुष्य खूप कठीण आहे. फक्त एक शुक्रवार तुमच्या भविष्याचा फैसला करतो’ असं तीनं म्हटलंय.
आपल्या ‘इमेज’ला धक्का लागेल असं काहीही न करण्याचं बिप्सनं ठरवलंय. बिपाशा बसूनं विक्रम भट यांच्या ‘राज’ या चित्रपटात काम केले होतं. या चित्रपटात तीनं साकारलेली नकारात्मक भूमिकाही प्रेक्षकांनी उचलून धरली होती. लवकरच विक्रम भट यांच्या ‘क्रिएचर’ तसंच नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्या ‘आत्मा’ या दोन चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
First Published: Tuesday, January 29, 2013, 13:02