सिनेमांत काम देतो म्हणून लैंगिक शोषण, इंदर कुमारला अटक, bollywood actor inder kumar arrested for all

सिनेमांत काम देतो म्हणून लैंगिक शोषण, अभिनेता इंदरला अटक

सिनेमांत काम देतो म्हणून लैंगिक शोषण, अभिनेता इंदरला अटक

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलिवूडमध्ये काम मिळवून देतो असं सांगत एका २३ वर्षीय मॉ़डेल तरुणीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली बॉलिवूड अभिनेता इंदर कुमार सराफ याला आज अटक करण्यात आलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, इंदरनं गुरुवारी सायंकाळी पीडित तरुणीला मुंबईतील अंधेरीस्थित आपल्या घरी बोलावलं होतं. इथं त्यानं या तरुणीवर बीअरच्या बाटलीनं हल्लादेखील केला. पीडितेच्या म्हणण्यानुसार, इंदर कुमारनं तिचं लैंगिक शोषणही केलंय. बॉलिवूडमध्ये सिनेमांमध्ये मुख्य भूमिका मिळवून देतो, असं सांगून इंदरनं या तरुणीला आपल्या जाळ्यात ओढलं होतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमार आणि त्याची पत्नी पल्लवी यांच्यातही गुरुवारी सायंकाळी जोरदार भांडण झालं होतं. यानंतर पल्लवीनं वर्सोवा पोलीस स्टेशन गाठलं. यावेळी तिनं आपल्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला. यानंतर इंदर कुमारही पोलीस स्टेशनमध्ये दाखल जाला आणि आपल्या पत्नीसोबत भांडण मिटवून ते दोघेही घरी परतले.

यानंतर, पीडित मॉडेल तरुणीला गोष्टी स्पष्ट करण्यासाठी इंदर कुमारच्या घरी बोलावण्यात आलं. परंतु, यावेळी परिस्थिती आणखीनच बिघडली. आणि आरोपी इंदर कुमारनं मॉडेलवर दारुची बाटली फेकून मारली.

पीडित तरुणीनं यासंबंधी तक्रार दाखल केल्यानंतर इंदर कुमारवर आयपीसीच्या विभिन्न कलमांखाली आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला.

इंदर कुमार यानं तुमको ना भूल पाएंगे, वांटेड, माँ तुझे सलाम, खिलाडियों का खिलाडी, बागी आणि मासून यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलंय.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, April 25, 2014, 21:21


comments powered by Disqus