बॉलिवूडची ब्युटी क्वीन झाली ६९ वर्षांची, Bollywood beauty queen was 69 years old

बॉलिवूडची ब्युटी क्वीन झाली ६९ वर्षांची

बॉलिवूडची ब्युटी क्वीन झाली ६९ वर्षांची
www.24taas.com झी मीडिया, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री सायरा बानू यांचा आज ६९ वा वाढदिवस आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता दिलीप कुमार यांच्याशी लग्न केलेली सायरा बानू ही बॉलिवूडमधील ब्युटी क्वीन अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

सायरा बानू हिचा पहिला सिनेमा ‘जंगली’ हा असून या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता शम्मी कपूर यांनी काम केले होते. सायरा बानू ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होती. तिने आपला बराच काळ हा सुपरस्टारसोबत घालवला होता.

सायराने आपले शिक्षण लंडनमध्ये पूर्ण केले आणि वयाच्या १६ वर्षी सिनेमासृष्टीत पदार्पण केले. ‘जंगली’ या सिनेमानंतर सायरा बानू हीने अनेक सिनेमात काम केले. धमेंद्र, राजेंद्र कुमार, जॉय मुखर्जी यांच्यासोबत तिने काम केले. तिला एक सुपरस्टार म्हणून स्थान फक्त क्लासिक विनोदी ‘पडोसन’ या सिनेमानंतर मिळाले.

सायरा बानू हीला एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत लग्न करायचे होते. वयाच्या २२ वर्षी तिने अभिनेता दिलीप कुमार यांच्यासोबत लग्न केले. सायरा बानू ही अनेक सिनेमातून एक सुंदर अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध झाली. तिने प्रत्येक सिनेमात अगदी उत्साहाने काम केले.तिने तिची फार मोठी कारकीर्द नाही पण ती अतिशय चांगली अभिनेत्री म्हणून आज पण ओळखली जाते.

सायरा बानूचे सौंदर्य आणि जादू आजही बऱ्याच जणांच्या मनात घर करून आहेत. सायरा बानू हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, August 23, 2013, 12:23


comments powered by Disqus