Last Updated: Tuesday, November 27, 2012, 16:36
www.24taas.com, मुंबईबॉलिवूड स्टार अभिनेत्री राणी मुखर्जीने आता शोध घेण्याचा फंडा अवलंबिला आहे. तीला आता तलाश आहे अॅक्शन रोलची. राणीला आता हळूहळू नावीन्य शोधण्यात मग्न आहे. आपण आऊटडेटेड झालो आहे, हे तिच्या लक्षात आल्याने काहीतरी नवीन करण्यासाठी धडपड करीत आहे.
‘पहेली’पासून राणीच्या आयुष्यात फ्लॉपची मालिका सुरु झालेली पहेली आतापर्यंत सुटली नाही. मग तो ‘कभी अलविदा ना कहना’ असो वा ’दिल बोले हडीप्पा’ किंवा आत्ताचा आलेला ‘अय्या’ असो.
मात्र, अपवाद ठरला आहे तो ‘नो वन किल्ड जेसिका’. राणीच्या नावावर आता एकही हिट चित्रपट नाही. त्यातच ‘अय्या’ चित्रपटाने राणीचा चांगलाच अय्या केल्यावर राणीची दारमदार आता आमीर खानच्या आगामी ‘तलाश’वर आहे. हा चित्रपट किती साथ देतो त्यावर राणीची भूमिका ठरणार आहे. मात्र, राणीला अॅक्शन रोलची भूमिका साकारायची आहे.
राणीने सध्याच्या हिरोइन्स दीपिका पदुकोण, प्रियांका चोपडा आणि जॅकलिन फर्नांडीसप्रमाणे आता अॅक्शन रोल करायची इच्छा व्यक्त केली आहे. राणी आता गुंडांबरोबर ढीशूम ढीशूम करताना दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. वाट पाहू या, राणीची अॅक्शन ईच्छा पूर्ण होते का?
First Published: Tuesday, November 27, 2012, 16:36