बोनी कपूर यांना खंडणीसाठी धमकी!, Boney Kapoor gets Exstortion Call

बोनी कपूर यांना खंडणीसाठी धमकी!

बोनी कपूर यांना खंडणीसाठी धमकी!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलिवूड निर्माता –दिग्दर्शक बोनी कपूर याला अंडरवर्ल्डमधून धमकी आली आहे. बोनी कपूर याच्याकडे अंडरवर्ल्डमधील काही लोकांनी खंडणी मागितली आहे. बोनी कपूर अभिनेत्री श्रीदेवीचे पती तसंच अभिनेता अनिल कपूरचे बंधू आहेत. ‘इशकजादे’ फेम अर्जून कपूरचे ते वडील आहेत.

अंडरवर्ल्डमधून खंडणीसाठी फोन आल्यावर बोनी कपूर यांनी अँटी एक्स्टॉर्शन सेलमध्ये तक्रार नोंदवली आहे. धमकी आल्याबद्दल कपूर कुटुंबाला पोलीस सुरक्षा मिळण्याची शक्यता आहे. पोलिसांनी तक्रारीनंतर तपासणीला सुरूवात केली आहे. अंडरवर्ल्डमधील नेमक्या कुठल्या गॅगने कपूर यांना धमकी दिली आहे, याची चौकशी पोलीस करत आहेत.

बोनी कपूर हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक आहेत. यापूर्वी ‘सूर क्षेत्र’या टीव्ही शोची निर्मिती त्यांनी केली होती. या कार्यक्रमात पाकिस्तानी गायकांची उपस्थिती असल्यामुळे हा कार्यक्रम वादामध्ये अडकला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, September 5, 2013, 16:41


comments powered by Disqus