अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या वडिलांचे निधन, BREAKING: Priyanka Chopra’s father passes away

अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या वडिलांचे निधन

अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या वडिलांचे निधन

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचे वडील डॉ. अशोक चोप्रा यांचे येथील रुग्णालयात आज (सोमवार) निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते.

अशोक चोप्रा यांना कर्करोग झाला होता. काही दिवसांपूर्वी उपचारासाठी त्यांना कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. उपचार सुरू असतानाच त्यांचे आज निधन झाले.

गेल्या आठवड्यात डॉ. चोप्रा यांची प्रकृती खालावली होती. या टेन्शनच्या काळातही प्रियंकाने आपल्या असानिमेंट सोडली नाही. वडील रुग्णालयात दाखल असताना ती शुटिंग करत होती. तसेच शुटिंगच्या ठिकाणीही तीने कोणाला वडील आजारी असल्याचे सांगितले नाही. सध्या प्रियंका चोप्रा मेरी कोमच्या भारतीय बॉक्सरच्या जीवनावरील चित्रपटाचे शुटिंग करत आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, June 10, 2013, 14:27


comments powered by Disqus