`भाग मिल्खा भाग` पाहून कार्ल लुईस हेलावला, Carl Lewis watches `Bhaag Milkha Bhaag`, calls Milkha

`भाग मिल्खा भाग` पाहून कार्ल लुईस हेलावला

`भाग मिल्खा भाग` पाहून कार्ल लुईस हेलावला


www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

मिल्खा सिंगच्या जीवनावर बनविण्यात आलेला `भाग मिल्खा भाग` हा चित्रपट भारतातच नाही, तर जगभरात प्रसिद्ध होत आहे. अमेरिकेचा जगप्रसिद्ध धावपटू कार्ल लुईस हा चित्रपट पाहून प्रभावित झाला आणि त्याने चक्क मिल्खा सिंग यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे.

मिल्खा सिंग यांनी कार्ल लुईसने आपल्याशी चर्चा केल्याचे मान्य केले आहे. सिंग म्हणाले, चित्रपट पाहून कार्लने मला फोन केला होता. तो हा चित्रपट पाहून हेलावला. अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्ग काढत मी देशाचे प्रतिनिधित्व केल्याचे पाहून तो हैराण झाला. त्याच्या बोलण्यात भावनांचा ओलावा होता. कार्ल लुईस मला एक भेट वस्तू पाठविणार आहे, त्याने माझा पत्ताही आवर्जुन विचारल्याचेही मिल्खा सिंग यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

`भाग मिल्खा भाग` या चित्रपटात फरहान अख्तर मिल्खा सिंग यांच्या मुख्य भूमिकेत आहे. फरहान अख्तरने ट्विटरवरून कार्ल लुईसने मिल्खा सिंग यांच्याशी चर्चा केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, July 16, 2013, 20:24


comments powered by Disqus