प्रियंका-कंगणामध्ये आता कॅटफाईट!Cat Fight Betwen Priyanka and kangana

प्रियंका-कंगणामध्ये आता कॅटफाईट!

प्रियंका-कंगणामध्ये आता कॅटफाईट!
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

बॉलीवुडमध्ये अभिनेत्रींच्या कॅटफाईट होतच असतात. त्यासाठी त्यांना कोणतेही खास कारण लागत नाही. हिरोईन्सच्या या भांडणांचे अनेक किस्से प्रसिध्द आहेत. सध्या प्रियंका चोप्रा आणि कंगणा राणावत यांच्यात आगामी क्रिश ३ च्या प्रमोशनवरून काही विवाद सुरू आहेत.

हृतिक रोशनची प्रमुख भूमिका असलेल्या क्रिश ३मध्ये या दोन्ही नायिका आहेत. या सिनेमाचे प्रमोशनचे काम अजून सुरू व्हायचे आहे. तरी आतापासूनच देसी गर्लचे नखरे सुरू झाले आहेत. तिने कंगणासोबत प्रमोशनसाठी कुठेही जाण्यास आणि प्रमोशन करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिलाय. त्यामुळे क्रिश ३ चे प्रमोशन धोक्यात आले आहे.

सध्या चित्रपटाच्या प्रमोशनचा चित्रपटाला हिट करण्यात मोठा वाटा असतो. चित्रपटाचे यशस्वी प्रमोशन करण्यात कलाकारांचा हिस्सा असतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन हृतिकही आपल्या चित्रपटाचे प्रमोशन दोन्ही हिरोईन्सना सोबत घेऊन करू इच्छित होता. मात्र या नायिकांच्या कॅटफाईटचा फटका क्रिश ३ ला होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार क्रिश ३ चे प्रमोशन कंगणा आणि प्रियंका वेगवेगळं करणार आहेत.

यापूर्वी या दोन्ही अभिनेत्रींनी फॅशन चित्रपटात एकत्र काम केले होते. पण त्यावेळी अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, October 18, 2013, 18:49


comments powered by Disqus