Last Updated: Saturday, April 27, 2013, 15:59
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईबिग बॉस सीझन-५ मध्ये पाहुणी कलाकार म्हणून आलेली सनी लिऑनने बॉलिवूडच्या तालावर अजून थिरकतेच आहे. महेश भट्टांच्या जिस्म -२ मधून बॉलिवूडमध्ये एंट्री करणाऱ्या सनी लिओने भारतातचं स्थिरावण्याचा विचारात आहे असचं वाटतयं.
आता बॉलिवूडलाही आणि प्रत्येक सिनेमांही तिची सवय झाली आहे. प्रत्येक दिग्दर्शकालाही सनीला आपल्या सिनेमांमध्ये नाचवल्याशिवाय चैन पडत नाही. आता ते शूट आऊट अॅट वडालामधलं लैला तेरी ले गयीचचं बघाना त्या गाण्याला लोकांनी एवढं डोक्यावर घेतलं कि ती आता वेलकमचा सिक्वेल वेलकम बॅकमध्येही एका आयटम साँगमध्ये थिरकताना दिसणार आहे.
याआधी जॉनने अक्षयला रिप्लेस करून वेलकम बॅक चर्चेत असताना त्यात सनी लिओनेची भर पडली आहे. त्यात आणखीन एक ट्विस्ट असा की, सनी लिओनेने आयटम साँगची राणी मल्लिका शेरावतला रिप्लेस केल आहे. तर एकूणच बिग बॉस सीझन-५ वेळी लॅंड झालेलं सनीचं विमान बॉलिवूड नगरीमध्ये स्थिरावण्याच्या विचारात आहे यावर शिक्कामोर्तब झाल्यात जमा आहे.
First Published: Saturday, April 27, 2013, 15:25