लग्नाच्या हंगामात बॉलिवूड स्टार्सची कोटीच्या कोटी उड्डाणं charges of Bollywood stars at marriage party

लग्नात नाचण्यासाठी कतरिना घेते ३ कोटी

लग्नात नाचण्यासाठी कतरिना घेते ३ कोटी
www.24taas.com, मुंबई

बॉलिवूडच्या स्टार्ससाठी लग्नाचे हंगाम म्हणजे सुगीचे दिवस असतात. बडे स्टार्सही या वेळी मोठमोठ्या लग्नांमध्ये हजेरी लावतात. त्यांचे डान्स परफॉर्मंसही असतात. मात्र यासाठी त्यांना घसघशीत किंमत मिळते. त्यामुळे त्यांचे भाव चांगलेच वाढले आहे.

एखाद्या बड्या लग्न समारंभात जेमतेम २० मिनिटं ते अर्धा तास हजेरी लावणारे स्टार्स एवढ्या वेळेसाठी करोडो रुपये आकारतात. लग्नात लोकांचं मनोरंजन करायचं असल्यास त्याची किंमत आणखी वेगळी असते. लग्नात लोकांशी बोलण्याचेही वेगळे चार्जेस घेतले जातात.

या स्टार्समध्ये सर्वांत जास्त रक्कम शाहरुख खान घेतो. तो लग्नात हजेरी लावण्याचे ३ ते ३.५ कोटी रुपये घेतो. तर अभिनेत्रींमध्ये कतरिना कैफ तेवढेच म्हणजे ३ कोटी रुपये घेते. गेल्यावर्षी ती लग्नांमध्ये परफॉर्म करण्याचे दीड कोटी रुपये घेत होती. मात्र यावर्षी तिने चक्क दुप्पट रक्कम केली आहे.

या शिवाय ऋतिक रोशन, अक्षय कुमार, सलमान खान सारखे अभिनेते लग्नात हजेरी लावण्याचे २.५ कोटी रुपये आकारतात. करीना कपूर फार कमी लग्नांना हजेरी लावते. तरी ज्या लग्नांना हजेरी लावते, तेथे परफॉर्म करण्यासाठी २ कोटी रुपये घेते. मलायका आरोरा-खान ६० लाख, अनुष्का शर्मा ५० लाख रुपये, बिपाशा बासू ४० लाख रुपये, मल्लिका शेरावत २५ ते ३५ लाख रुपये आकारते.

छम्मक छल्लो गाण्यामुळे बॉलिवूडमध्ये लोकप्रिय झालेल्या अमेरिकन गायक एकॉनला जर तुम्हाला लग्नात बोलवायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला २ कोटी रुपये द्यावे लागतीलच. पण याशिवाय येण्या जाण्यासाठी त्याच्यासाठी आणि त्याच्या स्टाफसाठी वेगळं चार्टर्ड प्लेनही द्यावं लागेल.

First Published: Wednesday, December 5, 2012, 21:07


comments powered by Disqus