लग्नापूर्वी सैफ आला अडचणीत, Chargesheet Filed Against Saif Ali Khan Just Before his Wedding

लग्नापूर्वी सैफ आला अडचणीत

लग्नापूर्वी सैफ आला अडचणीत

www.24taas.com, मुंबई
पुढील आठवड्यात सैफ आणि करिना यांचं लग्न होणार असून ऐन लग्नघाईतच सैफ वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. येत्या १६ ऑक्टोबर रोजी सैफ आणि करिना लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. लग्नासाठी हाताच्या बोटावर मोजण्याइतके दिवस उरलेले असताना सैफ विरोधात हाणामारीवरून कुलाबा पोलिस स्टेशनमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

फेब्रुवारी २०१२ मध्ये सैफनं रागाच्या भरात अनिवासी भारतीय असलेल्या इक्बाल शर्मासोबत ताज हॉटेलच्या एका रेस्टोरंटमध्ये हातापायी केली होती. शर्मा यांनी हा वाद झाल्यानंतर सैफविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी सैफला अटकही केलं होतं. त्यावेळी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सैफची सुटका करण्यात आली होती.

ही फेब्रुवारी महिन्यात घटना घटली होती. स्वतःची बाजू मांडण्यासाठी सैफला वेळ देण्यात आला होता, पण सैफ गैरहजर राहिल्याने, आरोपपत्र दाखल करण्यास उशीर झाला होता. यासर्व प्रकरणी कारवाई सुरू झाल्यानंतर सैफला आता न्यायालयाचे फेरे मारण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उरलेला नाही आहे, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने डीएनए या वृत्तपत्राला दिली आहे.

First Published: Friday, October 12, 2012, 19:13


comments powered by Disqus