Last Updated: Thursday, January 23, 2014, 20:11
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई दोन व्यक्ती ज्या कधीच एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून सुद्धा पाहत नाहीत, मात्र ते बेस्ट फ्रेंड्स? असंच काहीसं सध्या अभिनेता आमीर खान-सलमान खान यांच्या नात्यात होतंय.
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान सध्या त्याचा मित्र सलमानच्या `जय हो`चं प्रमोशन करण्यात व्यस्त दिसतोय. त्यानं आज ट्विटरवर सल्लूमियाँ सोबतचा एक फोटो टाकलाय.
या फोटोबद्दल आमीर लिहीतो, "सलमान आणि माझा हा सर्वात आवडता फोटो आहे. दो दोस्त एक झाड पे सुसु करते है तो दोस्ती बढती है". `जय हो`साठी एक दिवस बाकी...सिनेमा रिलीज व्हायच्या एक दिवस आधी टाकलेला हा फोटो.
जसं आमीर खान सलमानच्या चित्रपटाचं प्रमोशन करतोय. तसंच सलमाननं आमीरच्या धूम ३चं प्रमोशन `बिग बॉस ७`मध्ये केलं होतं. त्यानं धूम ३चं गाणंही भागाच्या शेवटी गायलं होतं. आमीर सलमानच्या याच वागण्याची परतफेड तर करत नाहीये ना...
एकूणच आमीर-सलमानची मैत्री नव्यानं खुलतेय असंच म्हणावं लागेल.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, January 23, 2014, 19:13