`केमोथेरेपी`साठी मनिषा घाबरलेल्या अवस्थेत, chemotherapy on manisha koirala

`केमोथेरेपी`साठी मनिषा घाबरलेल्या अवस्थेत...

`केमोथेरेपी`साठी मनिषा घाबरलेल्या अवस्थेत...
www.24taas.com, मुंबई

अभिनेत्री मनिषा कोईराला ही सध्या कँसरशी झुंजतेय. नुकतीच तीच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलीय. पण, यानंतर केल्या जाणाऱ्या केमोथेरेपीच्या ट्रीटमेंटसाठी मनिषा मात्र घाबरलेल्या अवस्थेत आहे.

बुधवारी मनिषावर केमोथेरेपीची ट्रीटमेंट सुरू करण्यात आलीय. याबद्दल मनिषानं फेसबूकवर माहिती देताना म्हटलंय, ‘आज माझ्यावर पहिल्यांदा केमोथेरेपी होणार आहे. खूप घाबरायला होतंय पण याबरोबरच मी या आव्हानाला धैर्यानं सामोरं जाण्यासाठी तयार आहे. त्यासाठी मी प्रार्थना करतेय. माझे आई-वडील, कोई (वहिणी), यूलिया यांच्याकडून मिळालेल्या सहकार्यामुळे मी त्यांची कृतज्ञ आहे. ते सध्या माझ्यापासून दूर आहेत. पण त्यांचं प्रेम आणि प्रार्थना माझ्याबरोबर आहे.’

‘माझा मित्रपरिवार आणि कुटुंबातील अन्य सदस्यांनी माझ्याबद्दल दाखविलेल्या आत्मीयतेबद्दल मी सर्वांची आभारी आहे. प्रेम आणि काळजी यापेक्षा मोठी गोष्ट असू शकत नाही’ असं म्हणत मनिषा भावूक झालीय.

४२ वर्षीय मनीषा सौदागर, १९४२ ए लव्ह स्टोरी, बॉम्बे, दिल से आणि लज्जा या सिनेमांतून लोकप्रिय झालीय. १० डिसेंबर २०१२ ला न्यूयॉर्कमध्ये पहिल्यांदा तिच्यावर शस्त्रक्रिया झालीय. त्यानंतर ११ दिवसांनी या हॉस्पीटलमधून तिला डिस्चार्ज देण्यात आला होता.

First Published: Thursday, January 3, 2013, 10:12


comments powered by Disqus