चिन्मय मांडलेकर साकारणार वसंतराव नाईक Chinmay mandalekar to play Vasantrao naik

चिन्मय मांडलेकर साकारणार वसंतराव नाईक

चिन्मय मांडलेकर साकारणार वसंतराव नाईक
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जीवनावर चित्रपट येतोय. यात अभिनेता चिन्मय मांडलेकर पडद्यावर वसंतरावांची भूमिका साकारणार आहे. मुंबईत नुकताच चित्रपटाचा मुहूर्त झाला...

हरितक्रांतीचे प्रणेते अशी ख्याती मिळवलेल्या माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जीवनपट आता सिल्व्हर स्क्रीनवर पहायला मिळणारे. थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 11 वर्ष मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेल्या या द्रष्ट्या नेत्याची भूमिका साकारायला मिळत असल्याने अभिनेता चिन्मय मांडलेकरही खूपच एक्साईट आहे...

निलेश जळमकर या तरुण दिग्दर्शकाने राजकीय पटलावरच्या या महानायकाचा संघर्ष मोठ्या पडद्यावर झळकवण्याचं शिवधनुष्य हाती घेतलंय.

एकूणच एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या जिद्दी, मेहनती तरुणाची ही कथा आहे. एक सर्वसामान्य तरुण ते प्रगल्भ राजकारणी असा जीवनप्रवास प्रेक्षकांना पहायला मिळेल, अशी आशा करूया...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, July 14, 2013, 18:59


comments powered by Disqus