Last Updated: Sunday, January 19, 2014, 23:56
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईअभिनेत्री माधुरी दीक्षित आणि जुही चावला गुलाब गँग चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा एकाच चित्रपटात प्रेक्षकांना दिसणार आहेत. म्हणून जुही आणि माधुरी यांच्या अभिनयाची तुलनाही सुरू झाली आहे.
माधुरी दीक्षितने यावर आपल्या डिक्शनरीत कठीण असा शब्दच नसल्याच म्हटलं आहे. माझा आणि जुही चावलाचा अभिनय अगदी वेगळा आहे.
मी चित्रपटात हिरोईनची तर जुही चावला विलनची भूमिका पार पाडणार आहे. यामुळे कृपया आमच्यात तुलना करू नका, असं माधुरी दीक्षितने म्हटलं आहे.
माधुरी आणि जुहीला अभिनयांमध्ये तुलना नको असली, तरी प्रेक्षकांनी मात्र तुलना सुरू केली आहे. चित्रपटाचा प्रोमो यू-ट्यूबवर आल्यानंतर ही तुलना सुरू झाली आहे. माधुरी दीक्षित आणि जुही चावलाच्या फॅन्समध्ये दरी पडतांना दिसत आहे.
माधुरीने दीक्षितने मात्र सुरूवातीपासून जुही चावलाच्या अभिनयाचं कौतुक करण्यास सुरूवात केली आहे. जुही चावलाचा अभिनय खूपचा चांगला झाला असल्याचं माधुरी दीक्षितने म्हटलं आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, January 19, 2014, 23:54