वीणाच्या लग्नानंतर बॉयफ्रेंडची पोलिसांत तक्रार दाखल, complaint registered against veena malik in mum

वीणाच्या लग्नानंतर बॉयफ्रेंडची पोलिसांत तक्रार दाखल

वीणाच्या लग्नानंतर बॉयफ्रेंडची पोलिसांत तक्रार दाखल

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सतत वादात असलेल्या पाकिस्तानी मॉडेल-अभिनेत्री वीणा मलिकनं नुकतंच दुबईत विवाह रचलाय. त्यानंतर एक आठवडाही उलटत नाही तोच वीणाच्या पूर्व बॉयफ्रेंडनं मुंबईमध्ये वीणाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केलीय.

वीणावर तिच्या पूर्व बॉयफ्रेंडला आणि त्याच्या कुटुंबीयांना धमकी देण्याची तक्रार दाखल झालीय. वीणाचा हा माजी बॉयफ्रेंड - प्रशांत मुंबईमध्ये राहतो. प्रशांतच्या म्हणण्यानुसार, वीणा आणि तो गेल्या दीड वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. ‘अगदी दुबईला जाण्याअगोदरपर्यंत ती माझ्यासोबतच होती. दुबईला जाणार असल्याचंही तिनं मला सांगितलं होतं. पण, तिथं जाऊन तिनं लग्न केलं ही बातमी मला मीडियातून समजली. ही बातमी ऐकून मला धक्काच बसला. यासंबंधी मी जेव्हा मीडियाशी बोललो तेव्हा वीणाकडून मला धमकीचे फोन येऊ लागले’ असं प्रशांतनं म्हटलंय.

‘मीडियासमोर काहीही बोललास तर तुझी तुझ्या कुटुंबीयांना बदनाम करेन... तुझ्या कुटुंबीयांकडेही बघून घेईन ’ अशी धमकीही विणानं प्रशांतला दिलीय. याबद्दल प्रशांतनं आरे पोलीस स्टेशनमध्ये शनिवारी तक्रार दाखल केली. परंतु, पोलिसांनी मात्र अजून एफआयआर दाखल केलेली नाही.

प्रशांतच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी याला सेक्शन ५०६ नुसार, साधारण तक्रार मानलंय आणि वीणा देशाच्या बाहेर असल्यानं आपण काहीही करू शकत नसल्याचं पोलिसांनी म्हटलंय. पोलिसांनी मला कोर्टात जाऊन केस करायला सांगितलंय... त्यानंतर पोलीस काहीतरी कारवाई करू शकतात, असं प्रशांतनं म्हटलंय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, December 29, 2013, 11:49


comments powered by Disqus