दिल्लीमध्ये राम-लीला रिलीज करण्यास नकार,Court restrains Sanjay Leela Bhansali from releasing`Ram Lee

दिल्लीमध्ये रामलीला रिलीज करण्यास नकार

दिल्लीमध्ये रामलीला रिलीज करण्यास नकार
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

निर्माता आणि दिग्दर्शक संजय लीला भंसाळीचा आगामी सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमात रणबीर सिंह आणि दीपिका पादुकोण आहेत. परंतु दिल्लीमधील एका न्यायालयाने हा सिनेमा रिलीज करण्यास नकार दिला आहे.

हा सिनेमा १५ नोव्हेंबरला संपूर्ण भारतात रिलीज होणार आहे. या सिनेमातील सेक्स, हिंसा, आणि अश्लिलतेच्या कारणांनी हिंदूच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचं एका याचिकेत म्हणण्यात आलं होतं. न्यायालयाने याचिकेवर विचार करून निर्णय दिला आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने यापूर्वी या सिनेमाला बंदी घालण्यास नकार दिला होता आणि सिनेमा विरोधात याचिका दाखल करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेवर ५० हजार रुपयांचा दंड लागू केला होता.

अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एएस जयचंद्र यांनी अल्पकालीक आदेशात भंसाळी आणि इरोज प्रमोटर्स यांना पुढील आदेशापर्यंत सिनेमाला रिलीज करण्यासाठी थांबवले होते. रामलीला हा शब्द प्रभू श्रीरामासोबत जोडला गेला असल्यामुळे या सिनेमाला लोक या अपेक्षेने जाणार की याचा रामाच्या जीवनाशी काहीतरी संबंध असेल, परंतु हा सिनेमा त्यांच्या भावना दुखाऊ शकतो, असं न्यायालयाने मत मांडलं आहे.

हे प्रकरणी प्रभू समाज धार्मिक रामलीला कमिटीसह सहा याचिका कार्यकर्त्यांनी दाखल केली होती. यात या सिनेमाचे नाव बदलण्यास सांगितले होते.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, November 13, 2013, 15:46


comments powered by Disqus