तीन दिवसात `दबंग २`ची कमाई ६४ कोटी, Dabang 2 Earned Rs 64 crore in 3 days

तीन दिवसात `दबंग २`ची कमाई ६४ कोटी

तीन दिवसात `दबंग २`ची कमाई ६४ कोटी
www.24taas.com, मुंबई

सलमान खान यांचा बहुचर्चित ठरलेला असा सिनेमा `दबंग २` हा बॉक्स ऑफिसवरही दबंगगिरी करतो आहे. या सिनेमाच्या पहिला भाग असणाऱ्या दबंगने एक नवा रेकॉर्ड केलेला आहे. सलमान खानच्या `दबंग २` ला त्याच्या अपेक्षेनुसार बॉक्स ऑफिसवर शानदार ओपनिंग मिळालं आहे. या सिनेमाने सुरवातीच्या तीन दिवसात ६४ करोडपेक्षा जास्त कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी या सिनेमाला २१ करोड रूपयांची रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी या सिनेमाच्या कमाईत थोडी मंदी जाणवली. जवळ जवळ देशभरात १९ कोटींची कमाई केली आहे. मात्र रविवारी पुन्हा जबरदस्त कमाई करत दंबगने जवळ २४.५ कोटीचा गल्ला जमा केला.

या तीन दिवसात मिळून दबंग २ ने ६४ करोडपेक्षा अधिक कमाई केली आहे. या कमाईला पाहता असं वाटतं की, सलमान खान आपल्या मागील सिनेमाचा रेकॉर्ड तोडेल. सलमान खान याचा पहिला सिनेमा असणाऱ्या `एक था टायगर`ने पहिल्या दिवशी ३२ कोटीची कमाई केली होती. मात्र हा सिनेमा म्हणावा तसा काही प्रेक्षकांच्या पसंतीस पडला नाही. `दबंग २` च्या कमाईचा चढता आलेख पाहता. त्यामुळे हा सिनेमा लवकरच १०० कोटीच्या क्लबमध्ये समाविष्ट होईल अशी अपेक्षा आहे.

भारतातील ३५०० स्र्किनवर रिलीज झालेल्या ह्या सिनेमाने छोट्या आणि मोठ्या शहरात चांगलाच आवडलेला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अरबाज खान याने केले आहे.


First Published: Monday, December 24, 2012, 15:47


comments powered by Disqus