`पांडेजीं`साठी वाजवली `सन ऑफ सरदार`ने शिट्टी! ‘Dabangg 2’: When Ajay Devgn whistled for Salman Khan…

'पांडेजीं'साठी वाजवली 'सन ऑफ सरदार'ने शिट्टी!

'पांडेजीं'साठी वाजवली 'सन ऑफ सरदार'ने शिट्टी!
सलमान खान बॉक्स ऑफिसचा राजा असल्याचं ‘दबंग २’ने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. ‘दबंग २’ ही या वर्षातील सर्वात शेवटची धमाकेदार हिट फिल्म ठरली आहे. ‘दबंग’च्या यशाने सललमान खानने सर्व टीकाकारांची तोंडं बंद केली आहेत. सलमानच्या वाढत्या चाहत्यांमध्ये अजय देवगणही आहे.

‘दबंग २’ सिनेमा पाहून अजय देवगणने सलमान खानची तारीफ केली आहे. ट्विटरवर अजय देवगणने लिहीले आहे, “आत्ताच दबंग २ पाहिला... पांडेजी हमने भी क्या सीटी बजायी है आपके लियो!! चीअर्स@beingsalmankhan”


सलमान खान आणि अजय देवगमची मैत्री बॉलिवूडमध्ये प्रसिद्धच आहे. दिवाळीमध्ये अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार’ या सिनेमामध्येही सलमान खानने मैत्रीखातर ‘पठाण’ या पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. ‘सन ऑफ सरदार’ही तुफान हिट ठरला होता. ‘दबंग २’ ने रीलीजनंतर अवघ्या तीन दिवसांतच ६० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

First Published: Tuesday, December 25, 2012, 17:58


comments powered by Disqus