Last Updated: Tuesday, January 21, 2014, 09:11
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई आगामी `जय हो` या सिनेमात सलमान खान याला सोबत करतेय नवोदित अभिनेत्री डेझी शाह... पहिल्याच चित्रपटात डेझी मात्र सलमानवर फिदा झालीय.
`जय हो` या सिनेमात सलमानच्या नायिकेची भूमिका साकारून डेझी आपल्या करिअरला एक नवं वळण देतेय. आपला सहकलाकार हा एक भावून व्यक्ती असल्याचं तीनं म्हटलंय. इतकंच नव्हे तर, या भावूक व्यक्तीला बऱ्याचदा चुकीचं समजलं गेलंय, असंही तिनं म्हटलंय.
२८ वर्षीय अभिनेत्री डेझीनं शनिवारी एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बातचीत केली. यावेळी, सलमान हा खूपच चांगली व्यक्ती असल्याचं तीनं म्हटलंय. `तो खूपच रागीट आहे आणि त्याला खूपच लवकर राग येतो, असं लोकांना वाटतं. पण, मी म्हणेन की हा त्याचा राग नाही तर प्रेम आहे आणि हे त्याला व्यक्त करायचंय... कारण, तो खूप भावूक व्यक्ती आहे` असं डेझीनं म्हटलंय.
डेझीनं यापूर्वी कोरिओग्राफर म्हणून काम केलंय. सलमाननं तिला हेरलं आणि आपल्या आगामी `जय हो` या सिनेमात तिला अभिनयाची संधी दिली.
`जय हो` येत्या २४ तारखेला प्रदर्शित होणार आहे. ही एका `आम आदमी`च्या संघर्षाची कथा आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, January 21, 2014, 09:11