दीपिकाचे माझ्या आयुष्यात वेगळे स्थान - रणवीर, Deepika holds special significance in my life: Ranveer

दीपिकाला माझ्या आयुष्यात वेगळे स्थान - रणवीर

दीपिकाला माझ्या आयुष्यात वेगळे स्थान - रणवीर
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्यातील हळूवार नातेसंबंध अधिक खुलत आहेत. कधी सेटवर तर कधी मुलाखत देताना ही जोडी दिसत आहे. या जोडीने लागोपाठ हिट सिनेमे दिल्याने त्यांच्यातील केमेस्ट्री चांगली जुळली आहे. त्यामुळे हे दोघं एकमेकांसोबत दिसत आहेत. दीपिकाला माझ्या आयुष्यात महत्वाचे स्थान आहे, अशी कबुली खुद्द रणवीर याने दिलेय. त्यामुळे काय बोध घ्यायचा तो घ्या.

या दोघांची दिवसेंदिवस मैत्री फुलत आहे. तसेच बॉलिवूडमधील गॉसिपही माध्यमांच्या चर्चेचा विषय आहे. या नात्यामध्ये मैत्रीपेक्षा अधिका काहीतरी असल्याचे संकेत खुद्द रणवीरने दिले आहेत. दीपिकाचे माझ्या आयुष्यात खूप महत्वाचे स्थान आहे. दीपिका एक चांगली व्यक्ती आहे. तिचा मला आदर आणि कौतुक वाटते, असे रणवीरने एका मुलाखतीत म्हटले आहे.


रणवीरने दीपिकाची इतकी तोंडभरुन स्तुती केली. मात्र चाणाक्य रणवीरने तात्काळ यावर सफाई उत्तर दिले. मी कौतुक केले म्हणून कोणी त्याचा दुसरा अर्थ घेऊ नये. आम्ही चांगले मित्र आहोत हे सांगायला तो विसरला नाही, बरं का.

संजय लीला भन्साळींच्या रामलीला या चित्रपटात दोघे मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात काम करतानाच दोघांमध्ये घनिष्ट जवळीक वाढली आहे. अनेक कार्यक्रमांना हजेरी लावणाऱ्या या जोडीमधल्या केमिस्ट्रीने माध्यमांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे पडद्यावरचे हे प्रेम पडद्यामागेही सुरु असल्याची चर्चा आहे.

ती आणि मी चांगले मित्र आहोत. आम्ही दोघे एकत्र फिरायला जातो. जसा मी दीपिकाबरोबर फिरतो तसा मी इतरांबरोबरही फिरतो. पण दीपिका इतके ते प्रसिध्द नाहीत. दीपिका शांत स्वभावाची असल्याने तिच्याबरोबर फिरताना मला एक वेगळा आनंद मिळतो असे रणवीरने सांगितले.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, February 7, 2014, 18:07


comments powered by Disqus