दीपिका पादुकोण गेली भारावून , Deepika Padukone appreciation Fans

दीपिका पादुकोण कौतुकाने भारावली

दीपिका पादुकोण कौतुकाने भारावली
www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई

या वर्षीच्या दोन सुपरहिट सिनेमांची नायिका असलेल्या दीपिका पादुकोणच्या अभिनयाची तारीफ तिच्या फॅन्सनीच नव्हे तर समीक्षकांनीदेखील केली आहे.

ये जवानी है दिवानी आणि चेन्नई एक्स्प्रे ससारखे सुपरहिट सिनेमे दिलेल्या दीपिका पदुकोण सध्या बॉलिवूडची लकी गर्ल मानली जातेय. तिच्या ई-मेलवर रोज चाहत्यांनी धडाधड ई-मेल पडत आहेत. त्यामुळं दीपिका खूपच भारावून गेली आहे.
प्रत्येक मेल स्वतः वाचण्याचा आणि त्याला रिप्लाय देण्याचा ती प्रयत्न करतेय.

चाहत्यांचे असे मेल मला खूप प्रोत्साहन देतात, असं दीपिकानं म्हटलंय. तिचा आणि रणवीर सिंगचा राम-लीलादेखील रिलीजच्या वाटेवर आहे. हा सिनेमा १००कोटी क्ल.बमध्ये गेला, तर एकाच वर्षी तीन सुपरहिट सिनेमे देणारी दीपिका बॉलिवूडची पहिलीच अभिनेत्री ठरण्याची शक्यता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, October 18, 2013, 16:15


comments powered by Disqus