दीपिकाच्या हातून गेली हॉलिवूडची ऑफर, Deepika Padukone not part of Fast and Furious 7 due to date issues

दीपिकाच्या हातून गेली हॉलिवूडची ऑफर

दीपिकाच्या हातून गेली हॉलिवूडची ऑफर
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सुप्रसिद्ध हॉलिवूड सिनेमा `फास्ट अँड फ्युरिअस`च्या सातव्या भागात काम करण्याची ऑफर दीपिका पदुकोणला नाकारावी लागली आहे. दीपिका बॉलिवूडमधल्या सिनेमांमध्ये सध्या एवढी व्यस्त आहे की `फास्ट अँड फ्युरिअस ७` सिनेमात तिला काम करता येणार नाही.

फास्ट अँड फ्युरिअस ७ ची ऑफर ही दीपिका पदुकोणसाठी अतिशय महत्वाची ऑफर होती. या सिनेमातून दीपिका आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणार होती. मात्र सध्या दीपिका शाहरुखखानसोबत हॅप्पी न्यू इयर या सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. तसंच संजय लीला भन्साली दिग्दर्शित रामलीला हा तिचा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनमध्येही बिझी आहे. त्यामुळे तिच्याकडे हॉलिवूडच्या सिनेमासाठी तारखा मोकळ्या नाहीत.

‘फास्ट अँड फ्युरिअस ७’च्या शुटिंगसाठी हॉलिवूड निर्मात्याने दीपिकाच्या १० सप्टेंबरपासून तारखा मागितल्या होत्या. मात्र सध्या बॉलिवूडचे दोन सिनेमे ती करत असल्यामुळे दीपिकाला हॉलिवूडमध्ये पदार्पण करता येणार नाही.

“दीपिकाला ‘फास्ट अँड फ्युरिअस’च्या सातव्या भागासाठी ऑफर आली होती. दीपिका फास्ट अँड फ्युरिअसच्या यापूर्वी रिलीज झालेल्या सर्वच भागांची मोठी फॅन आहे. मात्र दुर्दैवाने दीपिकाला या ऑफरला नकार द्यावा लागला. कारण तिच्याजवळ तारखाच शिल्लक नाही. सध्या दीपिकाने आपल्या सर्व तारखा ‘रामलीला’, ‘हॅप्पी न्यू इयर’ आणि ‘फाइंडिंग फॅनी फर्नांडिस’ या सिनेमांना दिलेल्या आहेत. त्यामुळे हॉलिवूडला शुटिंग करण्यासाठी ती जाऊ शकत नाही.” अशी माहिती दीपिका पदुकोणच्या अधिकृत प्रवक्त्याने या संदर्भात दिली.

याशिवाय दीपिका पदुकोणने स्वतःही याबद्दल पत्रकारांशी संवाद साधला. “हातून निसटलेल्या गोष्टींबद्दल बोलण्यापेक्षा हातात असलेल्या गोष्टींबद्दल बोलायला मला आवडेल.” असं दीपिकाने पत्रकारांना म्हटलं. या सिनेमासाठी चित्रांगदा सिंग, कंगना राणावत यांचीही स्क्रीन टेस्ट घेण्यात आली होती. मात्र या बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकत ‘फास्ट अँड फ्युरिअस’मध्ये भूमिका मिळवण्यात दीपिका यशस्वी झाली होती. मात्र हातात तारखाच नसल्यामुळे आता दीपिकाच्या हातून हॉलिवूडपटात काम करण्याची संधी सध्यातरी गेली आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, September 17, 2013, 16:22


comments powered by Disqus