नवीन टॅटू गोंदणार दीपिका! ,Deepika padukone to get a new tattoo

दीपिका गोंदणार नवीन टॅटू !

दीपिका गोंदणार नवीन टॅटू !
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आपल्या शरीरावर नवीन टॅटू काढणार असल्याची चर्चा आहे.

याआधी दीपिका रणबीर कपूर सोबत रिलेशनमध्ये असताना तिने गळ्यांवर टॅटू काढून आपल्या प्रेमाचा खुलासा केला होता. दीपिका आपल्या चित्रपटांसोबत टॅटू्च्या बाबत खूप बिनधास्त असलेले दिसते.

फिल्मफेयर मॅगझीनच्या माहितीनुसार, दीपिकाने टॅटू काढण्याची कल्पना तिचा जवळचा मित्र होमी अदजानियानी दिली आहे. होमी ने `कॉकटेल` चित्रपट दिग्दर्शित केला होता.

दीपिकाने या आधी आपल्या पायांच्या टांचावर देखील टॅटू काढला आहे. सध्या दिपिका कोणत्या डिझाईनचा आणि कसला टॅटू काढेल असा प्रश्न पडलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, June 17, 2014, 14:36


comments powered by Disqus