Last Updated: Friday, February 22, 2013, 15:35
www.24taas.com, नवी दिल्ली बॉलिवूडची हॉट गर्ल दीपिका पादुकोन आतूर झालीय प्रेक्षकांकडून कौतुकाचे शब्द ऐकण्यासाठी... रणबीर कपूरसोबत ‘ये जवानी है दीवानी’मधून ती प्रेक्षकांसमोर येणार आहे... तीही एका वेगळ्या ‘सेक्सी’लूकमध्ये...
नेहमी आपल्या अभिनयात आणि लूकमध्ये वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या दीपिकानं या सिनेमातही एक छोटा प्रयोग केलाय... ‘कॉकटेल’ आणि ‘रेस-२’ म्हटलं तरी पहिल्यांदा तुमच्यासमोर येईल तो दीपिकाचा बोल्ड अन् सेक्सी लूक… जो नक्कीच इतरांपेक्षा थोडा वेगळा ठरला...
‘ये जवानी है दिवानी’मध्ये एक विशिष्ट प्रकारचा चष्मा चढवून आलेली चष्मेवाली दीपिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास दीपिकाला आहे. कारण हा ‘चष्मेबद्दूर’ लूकही बोअर नसेल तर तो रोमान्टिक असेल असं दीपिकानं म्हटलंय.
स्वत: दीपिकाला तिचा हा लूक फारच आवडलाय. ती कशी दिसतेय या चष्म्यामध्ये, हे प्रेक्षकांकडून जाणून घेण्यासाठीही ती आतूर झालीय.
First Published: Friday, February 22, 2013, 15:35