दीपिकाच्या घरातच आहे टीकाकार, deepika`s sister is bigest critics in home

दीपिकाच्या घरातच आहे टीकाकार

दीपिकाच्या घरातच आहे टीकाकार

www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई
मुंबई संजय लीला भन्सालीचा नुकताच प्रदर्शित झालेल्या `राम लीला’मधून सर्वांचा कौतुकाची पात्र ठरलेल्या अभिनेत्री दीपिकाला दुसरं तिसरं कोणी नाही तर स्वतःच्या बहिणीच्या टीकेला सामोरे जावे लागते.

दीपिकाची छोटी बहिण अनीशा तिची सर्वात मोठी टीकाकार असल्याचे स्वतः दीपिकाने सांगितले. अनीषा तिच्या विचारांच्याबाबतीत ईमानदार आहे. ती माझी सर्वात मोठी टीकाकार असून, तिच्या मनात जे आहे तेच ती बोलते. मग ती माझ्याबाबतली टीका असली तरीसुद्धी ती सत्य बोलते. मला त्याचे अजिबात वाईट वाटत नाही कारण ती ईमानदार आहे आणि माझ्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा ती करते, असे दीपिकाने एका मुलाखतीत सांगितले.

रामलीलाच्या बाबतीत बोलायचं तर अनीषाला हा चित्रपट खूप आवडला. यशाच्या शिखरावर असलेली २७ वर्षीय दीपिका विवाहबंधनात अडकण्यासाठी तयार नसल्याचेही ती म्हणाली. तिच्या करियरचा आणि लग्नाचा काहीच संबध नसून, सध्या ती अशीच खूष असल्याचे तिने सांगितले.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, November 26, 2013, 10:01


comments powered by Disqus