ओळखा पाहू हा कोण? , Determine the view angle?

ओळखा पाहू हा कोण?

ओळखा पाहू हा कोण?
www.24taas.com, झी मीडिया, नवीन दिल्ली

फोटोमध्ये दिसणारी गुप्तहेर व्यक्ती ही दुसरी तिसरी कोणी नसून चक्क विद्या बालन आहे. हा वेष तिनं तिच्या आगामी चित्रपटासाठी ‘बॉबी जाजूस’साठी केला आहे. सध्या या चित्रपटाची शूटिंग हैदराबादमध्ये चालू आहे.

अभिनेत्री दिया मिर्जा आणि तिचा होणारा नवरा साहील संघाद्वारं निर्मित ‘बॉबी जाजूस’मध्ये अली फजल, अर्जुन बाजवा, अनुप्रिया, सुप्रिया पाठक, तन्वी आजमी, आकाश दहिया आणि राजेन्द्र गुप्ता हे सुद्धा या चित्रपटात सहाय्यक कलाकारांच्या भूमिकेत असतील. निर्मात्यांच्या मते, हा चित्रपट म्हणजे एक हृदयस्पर्शी कथा आहे. ज्यात एका महिलेनं पाहिलेलं स्वप्न ती पूर्ण करते... हे स्वप्न म्हणजे गुप्तहेर होण्याचं...

‘बॉबी जाजूस’मधील ही गुप्तहेराची भूमिका विद्या बालन हिनं साकारलीय. ती या चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका करणार आहे आणि चित्रपटात डॉनला तिची गरज लागणार हे स्पष्ट होतं. फोटोमध्ये ती भिकाऱ्याच्या रुपात भीक मागताना दिसत आहे.

चित्रपटाच्या पहिल्या छायचित्रांच प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढविल्या आहेत. तुम्हाला विद्याचा हा नवीन लूक कसा वाटला?


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, December 2, 2013, 16:27


comments powered by Disqus