Last Updated: Thursday, May 30, 2013, 20:25
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह यानं ‘लुटेरा’ची ‘राज की बात’ जाहीररित्या सांगून टाकलीय.
रणवीरच्या म्हणण्यानुसार, त्यानं ‘लुटेरा’तील व्यक्तीरेखा अधिक दमदार आणि उठावदार बनविण्यासाठी देव आनंदचे सगळे जुने सिनेमा पाहिलेत. याच सिनेमांतून मिळालेली प्रेरणा त्याला लुटेरामधील आपल्या व्यक्तीरेखेसाठी प्रेरणादायक ठरलीय.
२७ वर्षीय अभिनेता रणवीरनं `बँड बाजा बारात` या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री मिळवली आणि आपल्या करिअरला सुरुवात केली. लुटेराच्या प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, हा सिनेमा म्हणजे पन्नासच्या दशकांतील सिनेमांना आदरांजली आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, May 30, 2013, 20:25