सलमानच्या `डेझी`नं हत्येचा कट रचला होता?, dezi shah tries to kill satyendra yadav?

सलमानच्या `डेझी`नं हत्येचा कट रचला होता?

सलमानच्या `डेझी`नं हत्येचा कट रचला होता?

www.24taas.com, झी मीडिया, कन्नौज

आपल्या उद्दामपणामुळे अनेकदा चर्चेत येणार बॉलिवूडच्या दबंग खानसोबत म्हणजेच सलमान खानसोबत त्याच्या हिरोईन्सही आपल्या अभिनयापेक्षा इतर गोष्टींसाठी चर्चेत येत आहेत. सलमानच्या `जय हो` सिनेमातील नायिका डेझी शाह हिच्यावर तर चक्क हत्येचा कट रचल्याची तक्रार दाखल झालीय.

उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये सत्येंद्र यादव यानं डेझीविरुद्ध ही तक्रार नोंदविली आहे. डेझीसोबतच दीड डझन जणांविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार नोंदविण्यात आलीय. सत्येंद्र यादव हा एक अभिनेता आहे. सोबतच तो राजकारणातही सक्रिय दिसतो. एव्हढंच नाही तर सत्येंद्र स्वत: चित्रपट निर्माताही आहे.

डिसेंबर २०१३ मध्ये सत्येंद्र यादव एक कार अपघातात चांगलाच जखमी झाला होता. त्यावेळी नोंद केलेल्या एफआयआरनुसार हा केवळ एक अपघात होता. परंतु, आता मात्र सत्येंद्रनं हा अपघात नसून घडवून आणलेला कट होता, असा आरोप केलाय. पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीमध्ये, अभिनेत्री डेझी शाह आणि कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्यासहीत २१ लोकांच्या नावांचा समावेश आहे. आपल्याला मारण्यासाठी डेझी शाहसहीत इतर काही जणांनी हा कट रचल्याचा आरोप, सत्येंद्रनं केलाय.

आपल्या चित्रपटांपेक्षा सलमानही अनेकदा चर्चेत असतो. त्यातच भर म्हणजे काही महिन्यांपूर्वी `जय हो` सिनेमातील त्याची सहकलाकार सना खान हिच्यावरदेखील एका लहान मुलाचं अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद झाली होती आणि आता या यादीत याच चित्रपटात सलमानची लेडी लव्ह म्हणून पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर उभी राहिलेल्या डेझी शाहच्या नावाचाही समावेश झालाय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, February 11, 2014, 17:59


comments powered by Disqus