सलमानमध्ये मला माझं प्रतिबिंब दिसतं- धर्मेंद्र Dharmendra sees his reflection in Salman Khan

सलमानमध्ये मला माझं प्रतिबिंब दिसतं- धर्मेंद्र

सलमानमध्ये मला माझं प्रतिबिंब दिसतं- धर्मेंद्र
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

धर्मेंद्र यांना आजच्या आघाडीच्या कलाकारांमध्ये सर्वांत जास्त कोण आवडतं याचं उत्तर देता येत नाही. मात्र सलमान खानमध्ये त्यांना स्वतःचं प्रतिबिंब दिसत असल्याचं धर्मेंद्र स्वतः म्हणाले आहेत. ‘डान्स इंडिया डान्स सुपरमॉम’च्या ऑडिशनच्या वेळी धर्मेंद्र म्हणाले, की सलमानमध्ये मला मी दिसतो.

सध्याच्या अभिनेत्यांमध्ये तुमचा सर्वांत आवडता अभिनेता कोण? असा प्रश्न धर्मेंद्र यांना विचारल्यावर आजचे सगळेच कलाकार दमदार असून कुणा एकाची निवड मी करू शकत नाही, असं ते म्हणाले. “आजचे सगळेच अभिनेते मला माझ्या मुलांप्रमाणे आहेत. ऋतिक रोशनकडे स्वतःची स्टाइल आहे. शाहरुख खानची स्वतःची शैली आहे. सलमानमध्ये मला बऱ्याच अंशी माझं प्रतिबिंब दिसतं. तो काहीही करतो... अगदी गमतीदार डान्सच्या स्टेप्ससुद्धा. तो खूप भावूक आहे आणि चांगला डान्सर आहे.” असं धर्मेंद्र या प्रसंगी म्हणाले.

गंभीर भूमिकांपासून ते कॉमेडीपर्यंत, रोमान्सपासून ते हाणामारीपर्यंत सर्वच प्रकारच्या भूमिका धर्मेंद्र यांनी आपल्या तरुणपणी केल्या. आज प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं, यासाठी सलमान अगदी तसंच करत आहे. त्यामुळे धर्मेंद्र यांना सलमानमध्ये स्वतःचं प्रतिबिंब दिसतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, May 9, 2013, 18:32


comments powered by Disqus