Last Updated: Saturday, September 21, 2013, 13:29
ww.24taas.com, झी मीडिया, मुंबईसिनेमाची सिरीज म्हटली की त्यात काहीना काहीतरी नवीन हे असंतच.. मात्र, तरीही सिनेमातली एखादी गोष्ट ही सिनेमाचा युएसपी असते आणि तोच ठरतो सिनेमाच्या सिरीजचा ट्रेण्ड. असाच बिकिनी ट्रेण्ड धूमच्या तिस-या सिरीजमध्येही पाहायला मिळतोय.
धूम-३ सिनेमाची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा सुरु आहे.. आमिर खान जसं सिनेमाचं आकर्षण आहे तसंच कतरिना कैफचा बिकीनी अवतारसुद्धा धूम-३चं आकर्षण ठरतंय. धूम च्या याआधीच्या सिरीजमध्येही बिकिनीचा हा ट्रेण्ड पहायाल मिळाला होता.. धूममध्ये इशा देओलने त्यासाठी खास ट्रेनिंग घेतलं होतं.. तर धूम-२ मध्ये ऐश्वर्या राय आणि बिपाशा बासूही. बिकीनीसाठी स्लीमट्रीम झाल्या होत्या आणि आता याच बिकीनी ट्रेण्डमध्ये दिसणार आहे कतरिना कैफ.
धूम-३मधून कतरिना हटके लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यासाठी तिने स्पेशल ट्रेनिंग घेतलंय. एवढचं नाही तर जवळपास दीड तास वर्कआऊटही केलंय. आदीत्य चोप्रा कतरिनाला आजवर कधीही न पाहिलेल्या लूकमधून प्रेक्षकांसमोर आणतोय. तसं पाहता शिला की जवानीमध्ये कतरिनाने आपला कातिलाना अंदाज दाखवला होताचं. तेव्हा पुन्हा कतरिनाचा हा सेक्सी अँण्ड हॉट लूक कसा असणार याची उत्सुकता आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Saturday, September 21, 2013, 13:27