Last Updated: Monday, December 23, 2013, 18:44
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईआमीर खानच्या धूम - ३ ने तीन दिवसात १०० कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश मिळविला असून कमाईच्या बाबतीत धूमने विक्रम केला आहे.
धूम चित्रपटाने तीन दिवसात १०७. ६१ कोटींची कमाई केली आहे. यामध्ये तामिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या कमाईचा आकडा आहे. धूम ३ ने पहिल्या दिवशी ३६.२२ कोटी आणि दुस-या दिवशी ३३.३६ कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली आहे.
तसेच प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने शाहरूख खानच्या `चेन्नई एक्स्प्रेस` चित्रपटाचा विक्रम मोडला होता. गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत असलेल्या धूम - ३ या चित्रपटात आमिर खान सोबत कतरिना कैफ, अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा यांची प्रमूख भूमिका असून हा चित्रपट २० डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, December 23, 2013, 18:44