पाच दिवसात २०० कोटींची विक्रमी ‘धूम’, Dhoom 3 keeps the fire going at box office

पाच दिवसात २०० कोटींची विक्रमी ‘धूम’

पाच दिवसात २०० कोटींची विक्रमी ‘धूम’

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आमीर खानचा बिगबजेट धूम 3 बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय. अवघ्या पाच दिवसांमध्ये या चित्रपटाने तब्बल 200 कोटींची कमाई केली आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या धूम 3 ने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातलाय.

धूम आणि धूम 2 प्रमाणे धूम 3नेही रसिकांवर चांगलीच भुरळ घातली.. सुपरस्टार आमीरचा खलनायकी अवतार, हॉट कतरिनाच्या मनमोहक अदा आणि जोडीला अभिषेक- उदय चोप्राची केमिस्ट्री यामुळे धूम 3 नावाची बाईक बॉक्स ऑफिसवर सुसाट निघालीय.

अवघ्या पाच दिवसांमध्ये धूम 3 ने तब्बल 200 कोटींची कमाई केली असून बॉक्स ऑफिसवरचे सगळे विक्रम तोडण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. शाहरुख खानच्या " चेन्नई एक्सप्रेस"चा 226 कोटींचा तर ह्रतिक रोशनच्या "क्रिश 3" चा 240 कोटींचा रेकाँर्ड तोडून कमाईचे सगळे विक्रम हा चित्रपट मोडेल असा अंदाजही व्यक्त करण्यात येतोय..

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, December 27, 2013, 19:30


comments powered by Disqus